

चिकोडी : शॉर्टसर्किटने अचानक लागलेल्या आगीत कापडाचे दुकान जळून खाक झाल्याची घटना शहरातील गुरुवार पेठ येथे घडली आहे. यावेळी दुकानामागील घराना आग लागली.
शहरातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या गुरुवार पेठ येथे जयश्री गार्मेंट्स नावाच्या कापड दुकानाला अचानक आग लागली. बघता बघता संपूर्ण दुकानाने पेट घेतला. यामध्ये संपूर्ण दुकान जाळून खाक झाले. दुकानाच्या मागे असलेल्या घरानांनही आग लागली.
या घटनेबाबत समजताच चिकोडी अग्निशामक दलाचे जवान व पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.