

सुभाष कांबळे
अथणी : सन 1949 मध्ये स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर इन चीफ जनरल फ्रान्सिस बुचर होते. त्यांची जागा भारतीय लेफ्टनंट जनरल के. एम. करिअप्पा यांनी घेतली. ते स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करी अधिकारी होते. त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात भारतीय सैन्याचे नेतृत्व केले. पुढे करिअप्पाही फील्ड मार्शल बनले. फील्ड मार्शल के.? ? एम. करिअप्पा हे 15 जानेवारी 1949 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करप्रमुख झाले. भारताच्या इतिहासातील ही सर्वात महत्त्वाची घटना मानली जाते. त्यामुळे प्रतिवर्षी 15 जानेवारी हा दिवस भारतीय सेना दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय लष्करात अनेक युद्धांमध्ये आणि सेवेमध्ये संबरगी येथील जवानांचे मोठे योगदान आहे.
1971 च्या युद्धामध्ये संबरगी येथील सैनिक मोहन कांबळे शहीद झाले होते. 1965 व 1971 च्या युद्धात सहभागी असलेले सैनिक विठ्ठल कांबळे, आण्णाप्पा कांबळे, राऊ माने, गणपती शिंदे, गोविंद कांबळे, आकाराम कांबळे, आप्पासाब कांबळे, तुकाराम कांबळे, शिव्वाप्पा टोणे, बाळू बन्ने, विठोबा जोेतिबा बन्ने, शिवगोंडा कांबळे, शंकर कांबळे, मच्छिंद्र कांबळे,? ? प्रकाश कांबळे, यल्लाप्पा यमनाप्पा कांबळे, शामराव आप्पा कांबळे, चंदूलाल कांबळे, आप्पालाल कांबळे, लक्ष्मण बाळू पाटील यांनी उच्च पदावर कार्य केले. यामधील काहीजण शहीद झाले.
रामचंद्र कांबळे, शामराव कांबळे, दत्तू कांबळे, नायकू? लोहार, मच्छिंद्र कांबळे, कॅप्टन सुनील कोंडीबा चिंचणे,? सुभेदार किसान गंगाराम लोहार, सुभेदार गणपती शामराव वायफळे, सुभेदार अरुण देशपांडे, सुभेदार राजू रामू बंडगर,?सुभेदार देव्वाप्पा देवमाने, आनंदा गोपाळ माने, मारुती कुंडलिक टोणे, नारायण कांबळे, प्रधान देवमाने, सुभेदार मेजर मधुकर तुकाराम माने हे? सेवानिवृत्त झाले असून नायब सुभेदार अशोक कंटेकर सेवेत आहेत. सर्व माजी सैनिकांना एकत्र करून कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील संबरगी येथे माजी सैनिक कल्याण विकास संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून निवृत्त होणार्या सैनिकांचा सत्कार केला जातो. त्याचबरोबर गावातील युवकांना सैन्य भरतीसाठी मार्गदर्शन व सैन्यदलात निवड झालेल्या युवकांचे मनोबल, धैर्य वाढवून योग्य मार्गदर्शन करण्यात येते.
संघटनेकडून 15 जानेवारी सेना दिवस, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, कारगील विजय दिवस, ऑपरेशन सिंदूर विजय दिवस साजरा करण्यात येतो. गावातील 100 पेक्षा अधिकजण देश सेवेसाठी कार्यरत आहेत. 70 ते 75 निवृत्त सैनिक व 20 ते 25 वीरनारी आहेत. गावातील अनेक कुटुंबातील वडील, मुलगा, नातू व सख्खे भाऊ सैन्यदलात सेवेत आहेत.
आज विविध कार्यक्रम
माजी सैनिक कल्याण विकास संघटनेकडून प्रथमच 15 जानेवारी रोजी आर्मी सेना दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी पहाटे 6 वाजता आर्मी सेना ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केला आहे. माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे करण्यात आले आहे. यावेळी युवकांना सैन्यभरतीसाठी? ? मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सेना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी सैनिक संघाकडून देण्यात आली आहे.