Belgaum News : ग्रामीण मतदारसंघात विकासकामांना वेग

५.०२ कोटी निधीतून रस्ते, गटारकामाला प्रारंभ; आ. हेब्बाळकर यांच्या हस्ते प्रारंभ
Belgaum News : ग्रामीण मतदारसंघात विकासकामांना वेग
Published on: 
Updated on: 

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील प्रत्येक गावात पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने विकासकामांना प्राधान्य दिले जात असून, रविवारी (दि. ४) मतदारसंघातील विविध गावांमध्ये ५.०२ कोटी खर्चाच्या रस्ते व गटार बांधकामांना प्रारंभ करण्यात आला.

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मुतगा, बाळेकुंद्री (खु.), होनिहाळ, बाळेकुंद्री (बु.), सुळेभावी आणि मारीहाळ गावांमध्ये विविध कामांचे गावकऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. सुळगा-येळ्ळूर येथे युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते रस्ते कामाला सुरुवात करण्यात आली. मुतगा येथील अल्पसंख्याक वस्त्यांमध्ये ९० लाख खर्चाच्या नवीन काँक्रीट रस्ते व गटार बांधकामांचे भूमिपूजन लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.

आ. हेब्‍बाळकर यांनी गावातील अंगणवाडी केंद्राला भेट देऊन मुलांचे आरोग्य, पोषण आणि केंद्रात मिळणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. बाळेकुंद्री (खु.) गावातील अंतर्गत व बाहेरील भागात सुमारे ७५ लाख खर्चाच्या नवीन काँक्रीट रस्ते व गटार बांधकामांचे भूमिपूजन आमदार हेब्बाळकर यांनी केले. होनिहाळ गावातील अल्पसंख्याक वस्त्यांमध्ये सुमारे ४६ लाख खर्चाच्या काँक्रीट रस्ते व गटार बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले. बाळेकुंद्री (बु.) येथील अल्पसंख्याक वस्त्यांमध्ये ९६ लाख खर्चाच्या नवीन काँक्रीट रस्ते व गटार बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

सुळेभावी गावातील अल्पसंख्याक वस्त्यांमध्ये सुमारे ९० लाख खर्चाच्या नवीन काँक्रीट रस्ते व गटार बांधकामांचे गावकऱ्यांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले. मारीहाळ येथे १.०५ कोटी खर्चाच्या तीन रस्ते कामांना प्रारंभ करण्यात आला. शेताकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यासह इतर दोन रस्ते बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news