Belgaum: महसूल प्रभाग यापुढे निवडणूक प्रभाग

आयुक्त कार्तिक एम. : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही
Belgaum Municipal Corporation
Belgaum Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

बेळगाव : महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील महसूल प्रभाग यापुढे निवडणूक प्रभाग म्हणून ओळखले जातील, असे महापालिकेचे आयुक्त कार्तिक एम. यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, महापालिकेच्या कार्यक्षेत्रात ५८ प्रभागांच्या सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत. यापूर्वी, सदर प्रभागांना महसूल प्रभाग म्हटले जात असे. मात्र, महापालिकेचा अभियांत्रिकी विभाग आणि नगरसेवक यासह विविध विभाग या प्रभागांची ओळख वेगवेगळ्या पद्धतीने करत असत. यामुळे प्रशासकीय कामकाजात अनावश्यक गोंधळ निर्माण होत असे. याच कारणामुळे महसूल प्रभाग पद्धत यापुढे रद्द करण्यात आली असून, त्याऐवजी निवडणूक प्रभाग ही संकल्पना अंमलात येईल, असे आयुक्तांनी सांगितले आहे.

महापालिकेचे संपूर्ण प्रशासन आता निवडणूक प्रभागांच्या कक्षेत येणार आहे. महसूल विभागांतर्गत यापूर्वी कार्यरत असलेले कर संकलक आणि महसूल निरीक्षक यांना आता निवडणूक प्रभागांमध्ये नव्याने नियुक्त करण्यात आले आहे. निवडणूक प्रभागांनुसार पीआयडी तयार केले जातील आणि त्यानुसारच करांचा भरणा करावा लागेल. लोकांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन आयुक्त कार्तिक एम. यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news