Belgaum Online Job Fraud : वर्क फ्रॉम होम नाहीच, दोन लाखही गेले

रामदुर्गच्या महिलेची ऑनलाईन फसवणूक : जादा फायद्याचे आमिष
Work From Home Fraud
Work From Home FraudPudhari
Published on: 
Updated on: 

बेळगाव : इन्स्टाग्रामवर रील्स पहात असताना वर्क फ्रॉम होम करुन हजारो रुपये कमवा, अशी जाहिरात असलेल्या व्हिडिओवर एका महिलेने क्लीक केले. त्यानंतर या महिलेला एका ग्रुपवर सामील करुन घेत टप्प्याटप्प्याने १ लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक केल्याची नोंद जिल्हा सीईएनमध्ये झाली आहे. या प्रकरणी रामदुर्ग येथील तनुजा नामक ३४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, सदर महिलेने इन्स्टाग्रामवर एक लिंक केली. यानंतर तिला मेगा कॉर्पोरेशन नामक ग्रुपमध्ये सामील करुन घेतले. यानंतर तुम्हाला एक टास्क देतो, त्यानुसार काम करत जा, असे म्हणत तिला आधी थोडी रक्कम भरायला लावली. सदर महिलेने काही रक्कम भरली. यानंतर तिने यातील रक्कम काढता येते का हे पाहिले असता तिला ४,९३५ रुपयांची रक्कम काढता आली. त्यामुळे तिला यातून नफा मिळतो, असे वाटले. यानंतर तिने टप्प्याटप्प्याने तब्बल १ लाख ९६ हजार रुपये रक्कम भरली. यातील १ लाख रुपये तिने काढण्याचा प्रयत्न केला असता ती काढता येईना. तिने याबाबत विचारणा केली असता तुम्ही आणखी एक लाख रुपये भरा मग तुम्हाला सर्व रक्कम मिळेल, असे भामट्याने सांगितले.

परंतु, आपण फसलो आहोत, हे वेळीच लक्षात आल्यानंतर तिने पुन्हा रक्कम न भरता जिल्हा सीईएनमध्ये फिर्याद दिली. यामध्ये तिने १ लाख ९१ हजार ८६५ रूपयांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. पोलिस निरीक्षक श्रीशैल गाबी तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.