Belgaum Rain: जोडकुरळीत पावसाने घराची भिंत कोसळली

संततधार पावसामुळे घराची भिंत कोसळल्याची घटना जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील जोडकुरळी गावात घडली
Belgaum Rain: जोडकुरळीत पावसाने घराची भिंत कोसळली
Published on
Updated on

चिकोडी : संततधार पावसामुळे घराची भिंत कोसळल्याची घटना जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील जोडकुरळी गावात घडली.

गंगव्वा वराळे यांच्या मालकीचे हे घर असून सततच्या पावसामुळे घराच्या भिंती कमकुवत झाल्या होत्या. घटना घडली तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य जेवण करत होते. भिंत कोसळत असल्याचा अंदाज येताच घरातील सातही जणांनी प्रसंगावधान राखून तातडीने घराबाहेर धाव घेतली. त्यामुळे ते सुदैवाने बचावले. या घटनेत घराचे प्रचंड नुकसान झाले असून, गरीब कुटुंब उघड्यावर आले आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, नुकसानग्रस्‍त कुटुंबाला तत्काळ भरपाई देण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news