Belgaum Rain: सरींवर सरी, वादळी वारे

बेळगावात झाडांची पडझड; जुलैच्या पहिल्या सहा दिवसांत १३४ टक्के पाऊस
Rain
RainFile Photo
Published on
Updated on

बेळगाव : रविवारी विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी शहर परिसरात मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जुलै महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांत ७८.६ मिमी पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत हा पाऊस १३४ टक्के आहे. पावसापेक्षा वादळी वारे असून, त्यामुळे झाडांची पडझड झाली आहे.

भाग्यनगर आणि हनुमान नगर येथे थांबलेल्या कारवर झाड कोसळले. त्यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले. तर कपिलेश्वर उड्डाणपुलाशेजारी घराचा दर्शनी भाग कोसळला. या घटनांत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शहरात चन्नम्मा चौक, धर्मवीर संभाजी महाराज चौक, बेनन स्मिथ, जिल्हा रुग्णालय, क्लब रोड, गांधीनगर, शिवाजी नगर, नानावाडी, केशव नगर, अन्नपूर्णेश्वरी नगर आदी भागात पाणी तुंबून होते.

काही घरांत आणि दुकानांत पाणी शिरल्यामुळे लोकांची त्रेधातिरपिट उडाली. कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती देखरेख केंद्राच्या आकडेवारीनुसार, १ जून ते ६ जुलैदरम्यान बेळगाव जिल्ह्यात १८२.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे; हे प्रमाण १७९.५ मिमी या सरासरीपेक्षा २ टक्के अधिक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news