Belgaum Railway Theft : रेल्वेतून चोरलेले ११.५८ लाखांचे दागिने जप्त

रेल्वे पोलिसांची कारवाई; एकाला अटक
Belgaum Railway Theft : रेल्वेतून चोरलेले ११.५८ लाखांचे दागिने जप्त
file photo
Published on: 
Updated on: 

बेळगाव : रेल्वे प्रवासावेळी चोरी झालेल्या सोन्याच्या दागिन्यांसह आयफोन असा एकूण ११ लाख १८ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल बेळगाव रेल्वे पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून दुसऱ्या रेल्वे पोलिस ठाण्यातील चोरीचा गुन्हाही उघडकीस आला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, तक्रारदार महिला १६ सप्टेंबर रोजी रेल्वेने बंगळूरहून बेळगावला येत होत्या. त्यांनी सोन्याचे दागिने असलेली ट्रॉली बॅग आसनाखाली ठेवली होती. १७ सप्टेंबर रोजी सकाळी बेळगाव स्थानकात पोचल्यानंतर बॅगेतील सुमारे १० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी बेळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी बेविनमट्टीतील (ता. व जि. बागलकोट) एका संशयिताला अटक केली. त्याच्याकडून बेळगाव रेल्वे पोलिस ठाण्यातील गुन्ह्यातील ६७.६०० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच अरसीकेरे रेल्वे पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यातील १३.६३९ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ८५ हजार रुपये किमतीचा आयफोनही हस्तगत करण्यात आला. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ११ लाख १८ हजार ७०० रुपये आहे. रेल्वे पोलिस अधीक्षक सारा फातिमा, उपाधीक्षक सोमशेखर आणि रेल्वे पोलिस सर्कलचे निरीक्षक टी. एस. मुरगेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सत्याप्पा मुक्कन्नावर आणि कर्मचारी मल्लिकसाब मुल्ला, गुरुपाद कोरी व सुनील यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news