Belgaum News : ‘पुढारी’मुळे आमची त्रासापासून सुटका झाली

उड्डाणपुलासाठी माती परीक्षण करणाऱ्या ‘त्या’ कामगारांनी व्यक्त केली भावना
Belgaum News : ‘पुढारी’मुळे आमची त्रासापासून सुटका झाली
Published on
Updated on

बेळगाव : दै. ‘पुढारी’मुळे आम्हाला पाऊस, वाऱ्याच्या त्रासापासून सुटका झाली. आम्ही आता रात्री निवांतपणे झोपू शकतो, अशा शब्दांत उड्डाणपुलासाठी माती परीक्षण करणाऱ्या कामगारांनी आभार व्यक्त केले.

उड्डाणपुलाच्या माती परीक्षणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने काम सुरु केले आहे. राष्ट्रीय महामार्ग ते धर्मवीर संभाजी महाराज चौकापर्यंत हा उड्डाणपूल होणार असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात २७० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. त्यातून माती परीक्षणाचे काम सुरु झाले आहे. त्यासाठी तीन कामगार काम करत आहेत.

पण, त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली नव्हती. हे कामगार कॉलेज रोडवरील पदपथावर प्लास्टिकचा तंबू उभारुन राहात होते. पाऊस, वारा, चिखल आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका त्यांना होता. तरीही त्याकडे ठेकेदार आणि जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. यावर दै. पुढारीने बुधवारी (दि. १२) वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत नगरसेवक शंकर पाटील यांनी गुरुवारी (दि. १३) त्यांच्या राहण्याची सोय सरदार्स मैदानावरील महापालिकेच्या इमारतीत राहण्याची सोय केली.

दै. पुढारीमुळे कामगारांना राहण्याची सोय झाल्यामुळे आभार व्यक्त केले. दै, पुढारीमुळे आम्ही आता रात्री निश्चिंत झोपू शकतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. याशिवाय नगरसेवक पाटील यांनीही दै. पुढारीच्या पाठपुराव्याचे कौतुक केले. तर कामगारांच्या राहण्याची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करणारा ठेकेदार खजिल झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news