Belgaum Property Fraud: बनावट कागदत्रांद्वारे मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न

तीन महिलांना अटक : मूळ मालक असल्याचे भासवून विक्री
Fraud Case
Fraud CasePudhari
Published on
Updated on

बेळगाव : मालमत्तेचे मूळ मालक असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसऱ्याच्या नावावर विक्री करार करून फसवणूक केल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी तीन महिलांना अटक केली आहे. छाया अरुण कदम (वय ५७, रा. शिवाजी रोड, बेळगाव, सध्या रा. पाटील गल्ली, वडगाव), भाग्यश्री संतोष अतिवाडकर (वय ३५, रा. पाटील गल्ली, पिंपळ कट्टा, वडगाव) आणि जान्‍हवी विनायक भोसले (वय ३८, रा. कारभार गल्ली, वडगाव) अशी संशयितांची नावे आहेत.

याबाबत अशोक बाळाप्पा यरगुद्दी (रा. दुर्गकेरी, होन्‍नावर, जि. कारवार) यांनी ५ जून २०२४ रोजी मार्केट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, एम. एम. एक्स्टेंशनमधील प्लॉट क्रमांक ३०४, सेक्टर क्रमांक २, सीटीएस क्रमांक १०३२१ या मालमत्तेशी संबंधित बनावट दस्तऐवज तयार करण्यात आला होता.

तक्रारदार आणि त्यांच्या बहिणींच्या नावाने असलेल्या मालमत्तेचा व्यवहार त्यांनी प्रत्यक्षात केलेला नसतानाही संशयितांनी संगनमत करुन बनावट व्यक्तींना संबंधितांच्या जागी उपनिबंधक कार्यालयात बसविल्याचा आरोप आहे. तसेच वेब कॅमेऱ्यासमोर फोटो काढून घेऊन अंगठ्याचे ठसे व स्वाक्षऱ्या घेत विक्री करार तयार करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

हा बनावट दस्तऐवज खरा असल्याचे भासवून बेळगाव उपनिबंधक कार्यालयात ७ नोव्हेंबर २०२३ रोजी सादर करण्यात आला होता. तक्रारदाराच्या बहिणींच्या नावाचा गैरवापर करून मालमत्तेची नोंदणी करण्यात आल्याचे तपासात निष्पन्‍न झाले. तपासादरम्यान पोलिसांनी संशयिताची चौकशी केली.

यावेळी तिघींनी मालमत्तेच्या मूळ मालक असल्याचा कुठे सांगत उपनिबंधक कार्यालयात हजेरी लावली आणि संबंधितांच्या जागी बसून नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्याचे तपासात निष्पन्‍न झाले. त्यानंतर तिघींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. तपासातून फसवणुकीची पुष्टी झाल्यानंतर त्यांना शुक्रवारी (दि. १४) अटक करण्यात आली. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news