

बेळगाव : अल्पवयीन विद्यार्थिनीवर सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याबद्दल एका खासगी महाविद्यालयातील प्राध्यापकाला अटक झाली आहे. प्राध्यापकाच्या विरोधात कॅम्प पोलिस स्थानकात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून अटकेनंतर त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात झाली आहे. sexual assault case
नागेश्वर देमिनकोप्प (वय 34, रा. बसवण कुडची-बेळगाव) असे त्याचे नाव आहे. एका खासगी महाविद्यालयात अर्थशास्त्र व लेखा विभागात तो अतिथी व्याख्याता होता. त्याने दोन वर्षांपासून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
नागेश्वरने लैंगिक छळासाठी गणेशपूर येथे भाड्याने घर घेतल्याचे समजते. त्या घरात त्याने पीडितेवर वारंवार अत्याचार केले, तसेच कोणालाही माहिती दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्याने तिला सतत ’लिव्ह-इन रिलेशनशिप’साठी दबाव आणला. ही घटना नातेवाईकांजवळ उघड करू नये, असेही त्यांनी त्याला सांगितले. शिवाय कोणालाही ही माहिती सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. काही दिवसांपूर्वी सदर विद्यार्थिनीच्या मैत्रिणीने तिला नागेश्वरसोबत पाहिले. त्यानंतर तिने तात्काळ तिच्या पालकांना कळवल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबाने प्राध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन कॅम्प पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करून हिंडलगा कारागृहात पाठवले.