Belgaum news: पोलिसांतील माणुसकी : वृद्धाला दिला ‌‘आसरा‌’!

निराधार वृद्धाची बंद पडलेली पेन्शन पुन्हा सुरू; पोलिसांकडूनच पुढाकार
Belgaum news: पोलिसांतील माणुसकी : वृद्धाला दिला ‌‘आसरा‌’!
Published on
Updated on

बेळगाव : चोरांना पकडणे, बंदोबस्त ठेवणे व काठी घेऊन दादागिरी करणे, अशीच प्रतिमा पोलिसांची मानली जात असली आणि प्रत्यक्षात असली तरी एखाद्या निराधार वृद्धाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होणे दुर्मीळच. परंतु, यमकनमर्डीचे पोलिस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी प्रशासनाशी पत्रव्यवहार करत बंद पडलेली पेन्शन पुन्हा सुरू करून देत एका निराधार वृद्धाला खऱ्या अर्थाने ‌‘आसरा‌’‌’ दिला आहे.

वय झालेल्या, मुलांनी वाऱ्यावर सोडलेल्या आणि जगणे एकाकी बनलेल्या वृद्धांसाठी केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिक पालन-पोषण आणि कल्याण अधिनियम 2007 हा कायदा लागू केला आहे. तरीही अनेक मुले आपल्या वृद्ध आई-वडिलांना सांभाळण्याकडे दुर्लक्ष करतात. असाच बाका प्रसंग गेल्या काही महिन्यांपासून 80 वर्षांचे पुंडलिक जोतेप्पा लोहार (रा. मोदगा, ता. हुक्केरी) यांच्यावर ओढवला होता. त्यांना तीन मुली व एक मुलगा. आजारपणामुळे मुलाचे निधन झाले, तर मुली लग्न होऊन सासरी गेल्या आहेत. पत्नीही आधीच त्यांना सोडून गेली आहे. पुंडलिक 80 वर्षांचे आहेत. त्यांना सरकारच्या संध्या सुरक्षा योजनेंतर्गत 1200 रुपयांची पेन्शन मिळत असे.

निरीक्षकांची भावनिकता

काही महिन्यांपासून पोलिस खात्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी आसरा नावाने अभियान सुरू केले आहे. ज्येष्ठांच्या समस्या सोडवणे, हा या अभियानाचा हेतू. काही दिवसांपूर्वी हेड कॉन्स्टेबल बी. एस. कपरट्टी हे मोदगा गावात फिरत असताना त्यांना पुंडलिक यांची समस्या समजली. त्यांनी निरीक्षक जावेद मुशापुरी यांना कल्पना दिली. मुशापुरींनी वृद्धाच्या घरी भेट दिल असता पुंडलिकने पेन्शन काही महिन्यांपासून बंद झाल्याचे सांगितले. त्यानंतर मुशापुरी यांनी हुक्केरी तहसीलदारांशी पत्रव्यवहार करून पेन्शन बंद होण्याचे नेमके कारण विचारले. तेव्हा आधार अपडेट व ते बँकेशी लिंक केले गेले नसल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनीच पुढाकार घेऊन ही प्रक्रिया पार पाडली. यानंतर वृद्धाला पूर्ववत पेन्शन सुरू झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news