Belgaum News: पोलिसांच्या हाती फावडे; पालिकेचे वाभाडे

दुसऱ्यांदा खड्डा बुजवण्याची नामुष्की : प्रशासनाला जाग कधी येणार
Belgaum News: पोलिसांच्या हाती फावडे; पालिकेचे वाभाडे
Published on
Updated on

बेळगाव : रस्त्यावर एखादा भलामोठा खड्डा पडला तर तो किती दिवस उघडा असावा, याच्याशी महापालिकेचे काहीही देणे-घेणे नाही. जनता गेली खड्ड्यात आपण मात्र सुधारणार नाही, अशीच भूमिका महापालिका प्रशासनाने घेतल्याचे दिसून येते. रहदारी पोलिसांनी दुसऱ्यांदा हातात कुदळ व फावडे घेऊन खड्डा बुजवला. परंतु, याचे काहीही देणे-घेणे महापालिकेला दिसून येत नाही.

येथील शनी मंदिर परिसरात याआधी एक भलामोठा खड्डा पडला होता. त्या खड्ड्यामुळे सातत्याने रहदारीला अडथळा होत होता. तेव्हा येथे ड्युटीवर असणारे शेषमूर्ती नामक वाहतूक हेडकॉन्स्टेबलनी स्वतः एक ट्रॅक्टर माती आणून तो खड्डा बुजवला होता. परंतु, परवाच्या पावसामुळे व यातून अवजड वाहन गेल्याने येथे पुन्हा खड्डा पडला आहे.

परंतु, महापालिका वा सार्वजनिक बांधकाम खात्याला याचे काहीही देणे-घेणे नाही. येथे पुन्हा रहदारीला अडथला होऊ लागल्याने मंगळवारी शेषमूर्ती व त्यांच्या आणखी एका साथीदाराने स्वतःच फावडे व कुदळ मागवून येथील खड्डा बुजवण्यास प्रारंभ केला. त्यांचे हे छायाचित्र शहरात इतके व्हायरल झाले की त्याचे वृत्त बनले. यापूर्वीही त्यांनी गणवेशात असताना असेच काम केले होते. परंतु, याचे पालिका प्रशासनाला काहीही देणे-घेणे नाही. किमान आता तरी हा खड्डा कायमस्वरुपी बुजवला जाईल, अशी अपेक्षा बेळगावकरांनी करायला हरकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news