Betne stranded tourists : बेटणेत हरवले बेळगाव, पिरनवाडीचे १३ पर्यटक

नऊ महिलांसह गट अडकला; मध्यरात्री एकच्या सुमारास सुटका
Betne stranded tourists
Betne stranded touristsAI Photo
Published on: 
Updated on: 

खानापूर : जंगलातील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी धबधब्यावर गेलेले पिरनवाडी आणि बेळगाव येथील १३ पर्यटकांना वाट चुकल्याने अर्धी रात्र घनदाट जंगलात घालवण्याची वेळ आली. या गटात नऊ महिलांचा समावेश होता. रात्री १ वाजता त्यांना जंगलातून सुखरूप बाहेर आणले गेले. तथापि, या घटनेने जांबोटी-कणकुंबी परिसरातील जंगलात विनापरवाना प्रवेश आणि पर्यटनाचे प्रकार अद्याप सुरू असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

पिरनवाडी येथील एका कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या कामगारांना घेऊन दुकानमालक व त्यांचे कुटुंबीय गुरुवारी बेटणे गावापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या धबधब्यावर गेले होते. धबधब्यापर्यंत चारचाकी वाहन जाण्याची सोय नसल्याने त्यांनी इनोव्हा कार रस्त्यावर उभी करून जंगलातील पायवाट धरली. दुपारी धबधब्यावर पोहोचल्यानंतर सर्वांनी जलक्रीडेचा आनंद घेतला. सोबत आणलेले जेवणही आटोपले.

त्यानंतर गटातील तीन पुरुषांनी महिलांना एका ठिकाणी थांबण्यास सांगून जंगलात भटकंतीसाठी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, सायंकाळी परतताना त्यांची वाट चुकली. अंधार पडूनही ते परतले नाहीत. त्यामुळे चिंतेत पडलेल्या नऊ महिलांनीही त्यांचा शोध घेण्यासाठी जंगलात पाऊल टाकले. परिणामी, पुरुष आणि महिलांचे दोन्ही गट वेगवेगळ्या ठिकाणी भरकटले.

अंधारात एका पुरुष पर्यटकाच्या मोबाईलला काही क्षण नेटवर्क मिळाले. त्याने आपल्या मित्राला आपण बेटणे परिसरातील जंगलात हरवल्याची माहिती दिली. त्या मित्राने रात्री आठच्या सुमारास देवाचीहट्टी येथील काँग्रेस कार्यकर्ते दीपक कवठणकर यांना फोन करून घटनेची माहिती दिली. कवठणकर यांनी बेटणे येथील लक्ष्मण गावडे आणि अन्य चार युवकांना सोबत घेत धबधब्याच्या दिशेने धाव घेतली. जंगलात सुमारे दोन तास शोधमोहीम राबवल्यानंतर एका ठिकाणी नऊ महिला बसलेल्या दिसून आल्या.

विशेष म्हणजे, मदत करणारे युवक आवाज देत आणि ओरडत त्यांचा शोध घेत होते; मात्र महिलांनी सुरुवातीला प्रतिसाद दिला नाही. अंधारात आवाज ऐकून शिकारी असावेत, अशी भीती त्यांना वाटली. आपण महिला असल्याने आवाज देणे सुरक्षित ठरणार नाही, असे समजून त्या शांत बसल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.