Belgaum: पेट्रोल ८७, डिझेल ९१ पैशांनी महागले

आठवड्यात तिसऱ्यांदा दरवाढ : शहरात इंधनची टंचाई नाही
Belgaum: पेट्रोल ८७, डिझेल ९१ पैशांनी महागले
Published on
Updated on

बेळगाव : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्चे तेल महाग होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर, सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ८७ पैशांनी, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ९१ पैशांनी वाढ केली. मे महिन्यात केलेली ही तिसरी इंधन दरवाढ असून, दिल्लीत सीएनजीच्या दरात एका रुपयाने वाढ करण्यात आली आहे.

शनिवारी इंधन दरात वाढ झाल्याने बेळगावमध्ये पेट्रोलचा दर १०७.९० पैसे झाला तर डिझेलचा दर ९५.८८ पैसे झाला. शहरात इंधन पुरवठा सुरळीत असून कोठेही टंचाई नाही. भविष्यात पुन्हा इंधनच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

१५ मेरोजी पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रति लिटरमागे तीन रुपये वाढ झाली. त्यामुळे पेट्रोलचा दर १०६ रुपये झाला, तर डिझेलचा दर ९४ रुपये झाला होता. पुन्हा १९ रोजी पेट्रोल १०६.९३ तर डिझेल ९४.९० रुपयांवर पोचले. शनिवारी पुन्हा इंधनच्या दरात वाढ झाल्याने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ९० पैशांनी आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ९१ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शहरा पेट्रोल १०७. ९० रुपये, तर डिझेल ९५. ८८ रुपयांवर पोहोचले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news