Belgaum Onion Price : कांदा आवक वाढली; तरी दर कायम

महिनाभरापासून दर स्थिर; दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा, ग्राहकांना फटका
Onion Price
Onion Price
Published on: 
Updated on: 

बेळगाव : एकीकडे दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळलेले असताना बाजारात कांदा दर मात्र अद्याप स्थिर असल्याचे दिसून येते. गेल्या महिनाभरापासून कांद्याची किरकोळ विक्री ५० ते ७० रुपये किलो दराने होत आहे. त्यामुळे कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. अन्य भाजीपाल्याचे दरही चढेच असल्याने दुष्काळामुळे होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे.

महिन्यापूर्वी १० ते १५ रुपये किलो असणारा कांदा गेल्या महिनाभरापासून ५० ते ६० रुपये दराने विकला जात आहे. बाजारात नवा कांदा आल्यानंतर दर उतरतो, अशी स्थिती असते. कारण, अनेकदा कांदा ५० रुपये झाला आहे. परंतु, लगेचच याचा दर १० ते २० रुपयांवर आलेला यापूर्वी शेतकरी आणि ग्राहकांनीही पाहिला आहे. परंतु, यंदा बाजारात नवीन कांदा येऊनही त्याचा दर स्थिरच दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे यंदा पावसाचे कमी झालेले प्रमाण व भविष्यात कांद्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी वर्ग सांगत आहे.

बेळगावच्या बाजारात धारवाड, विजापूर, बागलकोट, गदग, कोप्पळ येथून कांदा येत आहेच. शिवाय महाराष्ट्रातूनही कांद्याची आवक आहे. पंधरवड्यापूर्वी दिवसाला दीड ते दोन हजार क्विंटल येणाऱ्या कांद्याची आवक तिप्पट झाली आहे. तरीही घाऊक कांदा दरात फारसा फरक पडलेला नाही. दर्जानुसार कांद्याचा दर किमान दोन हजार रुपये क्विंटलपासून ५,५०० रुपये क्विंटलपर्यंत आहे. विशेष म्हणजे नवीन कांदा बाजारात आल्यानंतर दर कमी होतो. परंतु, यंदा जुन्या कांद्याला मागणी वाढल्याने दर घसरलेला नाहीच, शिवाय नवीन कांद्यालाही चांगला दर मिळत असल्याचे दिसून येत आहे.

पावसाने ओढ दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांद्याला पुरवून पाणी वापरले आहे. अनेकांनी तर टँकरने पाणी घालून कांदा पीक घेतले आहे. त्या शेतकऱ्यांना दर चांगला मिळत असल्याचे समाधान आहे. परंतु, क्विंटलला पाच हजार रुपये दर मिळाला तर यामध्ये खर्च निघून थोडीफार रक्कम शिल्लक राहते. यापेक्षाही दर वाढल्यास आम्हाला अधिक फायदा होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news