

बेळगाव : पाच लाख रुपये किमतीचा एक किलो अफू जप्त करुन एकाला अटक केली. सीसीबी पोलिसांनी ही कारवाई केली. शुभम मदनलाल शर्मा (वय २९, रा. चेलावास, ता. मारवाड, जि. पाली, राजस्थान) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची माहिती पोलिस आयुक्तालयाने शुक्रवारी (दि. १९) पत्रकाद्वारे दिली आहे.
सदर तरुण बेळगावात अमली पदार्थ घेऊन आल्याची माहिती सीसीबीचे निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना मिळाली. त्यांनी महामार्गालगत हिंडाल्को फॅक्टरी परिसरात सापळा रचून सहकाऱ्यांसह जाऊन छापा टाकला असता उपरोक्त संशयित सापडला. त्याच्याकडे असलेली पिशवी तपासली असता यामध्ये १ किलो ४८ ग्रॅम काळ्या रंगाचे अफू सापडले. याची किंमत पाच लाख रुपये होते. पोलिसांनी तो जप्त करुन संबंधितावर गुन्हा दाखल केला.
सदर तरुण हा बंगळूरमधील खेताराम चौधरी याला देण्यासाठी अफू लिक्वीड आणल्याचे शुभमने कबूल केले. त्यामुळे, त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी सीसीबी पथकाच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.