Belgaon News | गर्भवतीचा रुग्णालयात मृत्यू, पोलिसही असंवेदनशील

पहाटेपासून पोलिस ठाण्यासमोर ठिय्या धरल्यानंतर दुपारी डॉक्टरांवर गुन्हा
pregnant women Death
खडेबाजार पोलिस स्थानकासमोर आक्रोश करताना नातेवाईक File Photo
Published on
Updated on

बेळगाव : सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेला पोटात दुखत असल्याने येथील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सदर घटना बुधवारी पहाटे घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची तक्रार मृत महिलेच्या पतीने खडेबाजार पोलिसांत दाखल केली आहे. तथापि, त्यासाठी त्यांना पोलिस स्थानकासमोर ठिय्या मांडावा लागला.

बुधवारी पहाटेपासून मृत महिलेचे पती अनिल चव्हाण यांनी शहराच्या मध्यवर्ती हॉस्पिटल व भागातील डॉक्टरांविरोधात तक्रार करण्यासाठी खडेबाजार पोलिस स्थानकात ठाण मांडून बसले होते. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. घटनेची माहिती नातेवाईकांनी पत्रकारांना दिल्यानंतर पत्रकारांनी पोलिसांना जाब विचारल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. आरती अनिल चव्हाण (वय ३०, रा. कंग्राळी के. एच.) असे महिलेचे नाव आहे. ती सहा महिन्यांची गर्भवती होती. पोटात दुखत असल्याने मंगळवारी (दि. ८) तिला येथील बेळगावच्या मध्यवर्ती भागातील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते.

डॉक्टरांनी उपचारासाठी ३० हजार खर्च येईल, असे सांगितले. नातेवाईकांनी होकार दिल्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले. मात्र रात्री आरती यांना त्रास होऊ लागला. यावेळी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नव्हते. नर्स उपचार करत होती. त्यानंतर अधिक उपचारासाठी केएलईला पाठवण्यात आले. मात्र आरती यांचा आधीच मृत्यू झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. अनिल चव्हाण यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच त्या महिलेचे नातेवाईक खाणशेत (ता. मावळ, जि. पुणे) येथून बेळगावात दाखल झाले. त्यानंतर आरती यांना पहिल्यांदा दाखल करण्यात आलेल्या हॉस्पिटलविरूद्ध खडेबाजार पोलिसांत एफआयआर दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news