

कारवार : गोव्यातून अवैधरित्या कर्नाटकात आणले जाणारे सुमारे साडेचार लाख रुपयांचे मद्य कारवार अबकारी खात्याच्या अधिकार्यांनी जप्त केले. मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली चार वाहनेही ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे.
कारवार तालुक्यातील माजाळी भागातील मैंगिणी, मुडगेरी, सिमेंट फॅक्टरी व सैल महाविद्यालय परिसरात अबकारी खात्याच्या अधिकार्यांनी ही कारवाई करुन चार प्रकरणे नोंदविली आहेत. त्यात एकूण 640 लि. मद्य, 72 बिअर कॅन असे सुमारे 4.37 लाख रुपयांच्या मद्याचा समावेश आहे. तर 2.90 लाख रुपये किमतीच्या चार दुचाकींचा समावेश आहे.
मद्य व वाहनांची एकत्रित किंमत सुमारे 7 लाख 17 हजार रुपये होते. वाहनाच्या क्रमांकानुसार दुचाकीमालकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अबकारी खात्याचे उपाधीक्षक रमेश भजंत्री यांनी दिली.