Belgaum robbery: नामदारवाडीत २ लाखांचा दरोडा

दाम्पत्याला मारहाण करून सोन्या-चांदीसह ऐवज लंपास
Robbery
RobberyPudhari
Published on
Updated on

अथणी : मदभावी-संबरगी रस्त्यावरील नामदारवाडी येथे दरोडेखोरांनी एका घरावर दरोडा टाकून सोन्या-चांदीसह सुमारे १ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरमालक कुमार श्रीमंत पाटील आणि त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण करण्यात आल्याची फिर्याद अथणी पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

बुधवारी पहाटे चारजणांची टोळी तोंडाला मास्क लावून घरात शिरले. कुमार पाटील हे शौचालयास गेले असता त्यांच्या तोंडावर कापड टाकून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील ५ ग्रॅमची बोरमाळ, ५ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ४ ग्रॅम वजनाची कानातील फुले तसेच सुमारे ८० ग्रॅम चांदीचे पैंजण असा एकूण सुमारे २ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

घरात इतर कोणी नसल्याची खात्री करूनच दरोडेखोरांनी हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. चाकूचा धाक दाखवत संपूर्ण दागिने लुटल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सांगली, बेळगाव आणि विजापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी तपासासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांचा तपास करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news