
Masnai Devi Yatra Muchandi
बेळगाव : मुचंडी (ता. बेळगाव) येथे दर तीन वर्षांनी होणारी मसणाई देवी यात्रा मंगळवारी (दि. 8) होत आहे. गावातील गोकाक रोड, मराठा शाळेसमोरील मसणाई देवी मंदिरात यात्रेची जय्यत तयारी सुरू असून मंदिरासमोर लोखंडी पत्र्याचा मंडप उभारण्यात आला आहे. तर मंदिराच्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ग्रामस्थ यात्रेच्या तयारीत गुंतले आहेत. गावातील अनेक घरांच्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे. मंगळवारी (दि. 8) पहाटे 5 वाजता अभिषेक होईल. यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम, गाऱ्हाण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवण्यात येणार आहे. यात्रा कमिटीतर्फे यात्रेचे नेटके नियोजन करण्यात येत आहे. मंदिराची विविध कामे लोकवर्गणीतून व देणगीतून सुरू आहेत. ग्रामपंचायतच्या माध्यमातूनही विविध कामे सुरू आहेत.