Belgaum truck fire: मकावाहू ट्रकला आग

बैलहोंगल तालुक्यातील सानिकोपजवळ धावत्या ट्रकला आग लागल्याची घटना शनिवार दि. २ रोजी घडली
truck fire
truck fire
Published on
Updated on

बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील सानिकोपजवळ धावत्या ट्रकला आग लागल्याची घटना शनिवार दि. २ रोजी घडली. यावेळी चालकाने ट्रकमधून उडी घेतल्याने तो सुदैवाने बचावला. मात्र या घटनेत ट्रक पूर्ण जळाला असून मोठे नुकसान झाले आहे.

सदर ट्रक नरगुंदहून बेळगावला मक्याची पोती घेऊन येत होता. बैलहोंगल तालुक्यातील सानिकोपजवळ येताच ट्रकच्या इंजिनमधून धूर येऊ लागला चालकाला काही समजण्यापूर्वीच अचानक इंजिनने पेट घेतला. यामुळे चालकाने ट्रक सोडून केबिनमधून बाहेर उडी घेतली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. तातडीने अग्निशामक दलाला याची माहिती देण्यात आली.

अग्निशामक दलाच्‍या जवानांनी न आग आटोक्यात आणली. मात्र ट्रक आणि त्यामधील मकाही जळाला होता. घटनेची नोंद बैलहोंगल पोलिस स्थानकात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news