Belgaum Liquor Raid: मोरब येथे दारूभट्टीवर छापा

१७९० लिटर मळी, १० लिटर दारू जप्त
Belgaum Liquor Raid: मोरब येथे दारूभट्टीवर छापा
Published on
Updated on

बेळगाव : बेळगाव जिल्हा पोलिसांनी कुडची पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोरब गावात छापा टाकून दारू तयार करण्यासाठी साठवलेला कच्चा माल आणि दारू जप्त केली. याप्रकरणी एका संशयिताला अटक करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

मोरब गावातील एका घरात दारू तयार करून विक्रीसाठी साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलिस प्रमुख के. रामराजन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आर. बी. बसरगी, अथणीचे डीएसपी प्रशांत मुन्नोळी आणि हारुगेरीचे पोलिस निरीक्षक रतनकुमार जिरग्याळ यांच्या मार्गदर्शनाखाली कुडची ठाण्याचे उपनिरीक्षक प्रीतम नायक व त्यांच्या पथकाने छापा टाकला.

या कारवाईत सुमारे १७९० लिटर मळी, १० लिटर तयार असलेली दारू, दारू काढण्यासाठी वापरण्यात आलेले बॅरेल व इतर साहित्य जप्त करण्‍यात आले. याप्रकरणी कुडची पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. या कारवाईत पोलिस कर्मचारी के. आर. साळुंके, ए. एल. कवटकोप्प, एच. एस. गुड्डाद , पी. एस. कोट , ए. ए. शेंडगे, ए. एस. पाटील तसेच महिला पोलिस कर्मचारी आर. एस. सनदी यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news