Belgaum Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

एम. के. हुबळीतील घटना
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

बेळगाव : भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पादचारी तरुण जागीच ठार झाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर एम. के. हुबळी गावाजवळ शनिवारी (दि. ५) रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. सिद्धराम बसाप्पा नंद्यागोळ (वय ३१, रा. सोमनट्टी ता. बेळगाव) असे मृताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शनिवारी रात्री अकराच्या सुमारास सिद्धराम हे रस्त्यावरुन चालत असताना धारवाडहून बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. वाहनचालकाने वेगावर नियंत्रण न ठेवता तसेच निष्काळजीपणे वाहन चालविल्याने हा अपघात झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अपघातात सिद्धराम यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरुन वाहनासह पलायन केले. याप्रकरणी कित्तूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४ सह १८७ अन्वये अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news