Belgaum Bribe Case : माधान्य आहार संचालिका लोकायुक्त जाळ्यात

हुक्केरीत छापा : ऑडिट बुक मंजुरीसाठी १५ हजारची मागणी
Belgaum Bribe Case : माधान्य आहार संचालिका लोकायुक्त जाळ्यात
Published on: 
Updated on: 

हुक्‍केरी : शाळेच्या माध्यान्ह आहार संबंधीचा हिशेब मंजूर करण्यासाठी १५ हजाराची लाच मागणारी सहाय्यक संचालिका रंगेहाथ लोकायुक्त जाळ्यात सापडली आहे. सविता पराप्पा हलकी असे त्यांचे नाव असून त्या हुक्केरी तालुका पंचायतीच्या अखत्यारित अक्षरदासोह सहायक संचालिका म्हणून कार्यरत आहेत.

अधिक माहिती अशी : प्रत्येक शाळेला मध्यान्ह आहारसाठी तांदळासह अन्य काय काय साहित्य आले, याची नोंद ठेवावी लागते. त्या नोंदीचे अक्षरदासोह कार्यालयातून वेळोवेळी ऑडिट करून घ्यावे लागते. शिपूर हायस्कूल मध्यान्ह आहारचा ऑडिट रिपोर्ट मंजुरीसाठी सविता हलकी यांच्याकडे पाठवण्यात आला होता.

या अहवालावर सही करण्यासाठी हलकी १५ हजाराची मागणी करत होत्या. लाचेच्या मागणीबद्दल बेळगाव तालुक्यातील मुत्नाळ येथील रविराज सरकारी शाळेचे शिक्षक परशुराम हज्जे यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचून गुरूवारी १५ हजारांची लाच घेताना हलकी रंगेहाथ सापडल्या. बेळगाव लोकायुक्त विभागाचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश यडहळ्ळी, पोलीस निरीक्षक संगमेश होसमनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.