Agniveer Recruitment: ‘मराठा’तर्फे २७ पासून मेगा 'अग्‍निवीर'भरती

कर्नाटक, महाराष्ट्र, गोव्यासह अन्य राज्यांतील उमेदवारांना संधी
Agniveer Recruitment
Agniveer RecruitmentPudhari
Published on
Updated on

बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे (एमएलआयआरसी) २७ जूनपासून ३ जुलैपर्यंत अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सेंटरच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर ही भरती होणार आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात व आंध्र प्रदेशातील उमेदवारांना भरतीत सहभागी होता येणार आहे. २८ व २९ जून रोजी महाराष्ट्रातील तर १ जुलै रोजी कर्नाटकातील उमेदवारांना संधी मिळणार आहे.

पहिल्या दिवशी २७ जून रोजी खेळाडूंसाठी शारीरिक चाचणी होणार आहे. २८ रोजी केवळ महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी अग्निवीर जनरल ड्युटी पदासाठी भरती होईल. यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई येथील उमेदवारांना सहभागी होता येईल. तर २९ रोजी नागपूर, नांदेड, नंदूरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमधील उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल.

१ जुलै रोजी मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवा, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. २ जुलै रोजी ट्रेड्समन पदासाठी भरती होईल. ३ जुलै रोजी ऑफिस असिस्टंट (क्लर्क), स्टोअरकिपर टेक्निकल या पदांसाठी केवळ मराठा इन्फंट्रीच्या माजी सैनिकांना संधी देण्यात येईल. सर्व पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा ८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा इन्फंट्रीतर्फे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news