

बेळगाव : महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत पाटील यांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईवर सोमवारी (दि. 8) बंगळूर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गोवावेस येथील खाऊ कट्टा येथे पवार आणि जाधव यांनी बेकायदा गाळे घेतल्याचा ठपका ठेवत प्रादेशिक आयुक्तांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. या आदेशाला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
दरम्यान पवार आणि जाधव यांच्याविरोधात प्रादेशिक आयुक्तांकडे उत्पन्न लपविल्याची तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे, प्रादेशिक आयुक्तांनी दोघांनाही नोटीस पाठवली असून स्पष्टिकरणाची सूचना केली आहे. त्या नोटीशीची मुदत 9 सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे आगामी दोन दिवस महापौर पवार आणि नगरसेवक जाधव यांच्यासाठी महत्वाचे असणार आहेत.