बेळगाव : पाच मटका बुकी आणि त्यांच्याकडे मटका लावण्यासाठी आलेले बारा जण अशा एकूण १७ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पैकी पाच बुकींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ८२ हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांतील मटकासंबंधी ही मोठी कारवाई आहे.
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये दिनेश प्रदीप इंगळे (वय ५४, रा. सुभाष मार्केट हिंदवाडी), कृष्णा महादेव जाधव (४५, कल्मेश्वर रोड, वडगाव), राहुल पांडुरंग कोंडुसकर ( ४०, रा. चौथा क्रॉस महाद्वार रोड), फिरोजखान सुलेमान सुरैय्या पेंडारी (३९, रा. शिवशक्तीनगर, अनगोळ), भालचंद्र दत्ता बडसकर (४२, रा. कल्मेश्वर रोड वडगाव), रवींद्र खटावकर (रा. बेळगाव), गजानन मारुती कंग्राळकर (५०), आझरूद्दिन गौस मिर्जाभाई (४८, रा. चौथा क्रॉस देवांगनगर, वडगाव),
मारुती नाना दळवी (५६, कल्मेश्वर रोड देवांगनगर वडगाव), सादिक युनूस चापगावकर (४०, रा. राजहंस गल्ली, अनगोळ), सदानंद महादेव कामकर (५६, विष्णू गल्ली, वडगाव), संजू शिवलिंग हादिमनी (३८, रा. मंगाईनगर, वडगाव), ईश्वर रामकृष्णा लोकुरे (६५, रा. मंगाईनगर, वडगाव), राजू यल्लाप्पा कडोलकर (३५, गणेशपेठ जुने बेळगाव), अनिल कल्लाप्पा बाळेकुंद्री (३६, रा. पाटील गल्ली, वडगाव), संगाप्पा शंकराप्पा चवलगी (६५, रा. चौथा क्रॉस देवांगनगर, वडगाव) व जनार्धन संजू पुजार (३८, संभाजीनगर बेळगाव) यांचा समावेश आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, उपरोक्त १७ जणांपैकी ५ जण वडगावमधील कपिलेश्वर रस्त्यावर असणाऱ्या घर नं. ३६ मध्ये मटका घेत असल्याची माहिती सीसीबीचे निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना मिळाली. दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन छापा टाकला असता मटका घेणारे पाचजण सापडलेच. शिवाय खेळणारेही १५ जण सापडले असून एकजण फरारी झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी शहापूर पोलिसांत नोंद झाली असून पुढील तपास निरीक्षक एस. एस. सीमानी करत आहेत.
पहिल्यांदाच मोठी कारवाई
शहापूर, वडगाव परिसरात मटका, जुगार मोठ्या प्रमाणात चालत असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून आहे. परंतु, काही पोलिस अधिकाऱ्यांचे हात गुंतलेले असल्याने कारवाई होत नव्हती. नवे पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव परिसरात मोठी कारवाई झाल्याने मटका, जुगारसह बेकायदेशीर धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.