Belgaum Burglary: ५० घरफोड्यांचे सूत्रधार जेरबंद

आंतरराज्य चोरटे, चार लाखांचा ऐवज जप्त
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

बेळगाव : बेळगाव पोलिसांनी दोघा आंतरराज्य चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून ४ लाख १८ हजार रुपयांचा घरफोडीतील मुद्देमाल जप्त केला. माळमारुती पोलिसांनी ही कारवाई केली. या दोघांनी बेळगावात पहिल्यांदाच, तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सुमारे ५० हून अधिक घरफोड्या केल्याचा संशय आहे. मोहन दौलत मुंडे (वय ३३, रा. क्रांतीनगर, अंबेजोगाई, जि. बीड) व श्याम साहेबराव जाधव (वय ३०, रा. भवताना, जि. बीड) अशी संशयितांची नावे आहेत.

उपरोक्त चोरट्यांनी काही दिवसांपूर्वी माळमारुती परिसरातील एक घर फोडले होते. संशयावरून त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी चोरीची कबुली दिली. या चोरट्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी महाराष्ट्रात अनेक घरफोड्या केल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई ठाणे हद्दीत दोन, वडगाव, लातूर ग्रामीण ठाणे, एमआयडीसी लातूर, बर्दापूर पोलिस ठाणे, नेकनूर, पुणे जिल्ह्यातील राजगड, आलमपूर व इंदापूर पोलिस ठाणे, विजापूर नाका पोलिस ठाणे यासह सुमारे ५० हून अधिक ठिकाणी केलेल्या चोऱ्यांचा समावेश आहे.

या चोरट्यांनी पहिल्यांदाच बेळगावात येऊन चोरी केली आणि माळमारुती ठाण्याचे निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या चोरीचा छडा लावण्यात माळमारुतीचे उपनिरीक्षक आनंद आदगोंड, उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी, उपनिरीक्षक उदय पाटील, पी, एम. मोहिते, प्रोबेशनरी उपनिरीक्षक प्रसन्नकुमार, बी. एफ. बस्तवाड, अरुण कांबळे, एम. जी. कुरेर, बी. एम. कल्लप्पन्नवर, सी. जे. चिन्नप्पगोळ, के. बी. गौराणी, सी. आय. चिगरी, महेश ओडेयर, मल्लिकार्जुन गाडवी यांचा मोलाचा वाटा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news