

बेेळगाव : भोगी सण तोंडावर आला आहे. त्यामुळे बाजारात गाजर, हिरवे वाटाणे, मेरूले आदी भाज्यांचे दर वधारले आहेत. बाजारात हिरव्या वाटाण्यांचा दर प्रतिकिलो 140 ते 150 रूपये झाला आहे. गाजर 50 ते 60 रूपये किलोने विक्री करण्यात येत आहे. अन्य भाजीपाल्यांचे दरही वाढले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एपीएमसी) भाजीपाला दरात वाढ झाली आहे. रताळी दरामध्ये किंचित वाढ झाली असून प्रतिक्विंटल दर 1,200 ते 1,800 रूपये झाला आहे. पालक, मेथी, कोथिंबीर आदींचे दर वाढले आहेत. शनिवार दि.3 रोजी कांदा प्रतिक्विंटल दर 1,000 ते 2,400 रूपये होता. बाजारात 85 ट्रक कांद्याची आवक झाली आहे. बटाटा प्रति क्विंटल दर 1,500 ते 2,300 रूपये असून किलोचा दर 30 ते 35 रूपये आहे. कोथिंबीर जुडी दर 10 ते 15 रुपये आहे. बाजारात कडधान्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे.
धान्य (प्रति क्विंटल) ः भात क्र. 1 : 2,600 ते 2,700, भात क्र. 2 : 2,200 ते 2,400, बार्शी ज्वारी : 4,500 ते 4,600, विजापूर ज्वारी : 4,600 ते 5,800, हायब्रीड ज्वारी : 3,000 ते 3,200, गहू क्र. 1 : 4,000, गहू क्र. 2 : 3,200, शेंगदाणा : 7,700 ते 7,800
तांदूळ :साधा तांदूळ क्र. 1 : 3,000 ते 3,100, साधा तांदूळ क्र. 2 : 2,700 ते 2,900, स्टीम हंसा : 4,000 ते 4,500, बासमती तुकडा : 3,300 ते 3,500, सावित्री गोल्ड सोनम : 4,200, सोनामसुरी क्र. 1 : 4,000 ते 4,500, सोना मसुरी क्र. 2 : 3,200 ते 3,400, सोनामसुरी क्र. 3 : 3,000 ते 3,200, रॉ राईस : 4,200, कुमुद तांदूळ : 7,200 ते 7,500, बेळगाव बासमती क्र. 1 : 7,200 ते 8,400, बेळगाव बासमती क्र. 2 : 7,000 ते 7,200, दिल्ली बासमती क्र. 1: 12,400, दिल्ली बासमती क्र. 2 : 11,000
डाळी (प्रति क्विंटल) तूरडाळ क्र. 1 : 13,450, तूरडाळ क्र. 2 : 12,200, हरभरा डाळ : 8,400 ते 8,500, मूगडाळ : 11,000 ते 12,000, मसूरडाळ : 7,500 ते 6,400, उडीद डाळ क्र.. 1 : 15,400,उडीद डाळ क्र. 2 : 14,000 , हरभरा : 8,000 ते 8,500, जवारी मसूर : 13,000, ते 14,000, नाशिक मसूर : 15,000 ते 16,000, मूग : 8,500 ते 9,000, मटकी : 11,000 ते 11,500.