Belgaum news: मराठीचा आकस; हॉटेलला टाळे

महापालिकेची तुघलकी कारवाई, व्यापार परवाना, बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र नसल्याचे कारण
Belgaum news: मराठीचा आकस; हॉटेलला टाळे
Published on
Updated on

बेळगाव : महापालिकेच्या पथकाने अनगोळ नाका येथील हॉटेलला गुरुवारी (दि. २१) टाळे ठोकले. या हॉटेलचालकाकडे व्यापार परवाना नाही, इमारतीला बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र नाही, असा ठपका ठेवून ही कारवाई केली असली तरी सुरवातीला कन्नड फलक नसल्यामुळे आणि त्यानंतर कन्नड बोलण्यात येत नाही, असा आरोप करुन अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कारवाई केल्याचे समजते.

अनगोळ नाका येथे सुरु झालेल्या हॉटेलवर मराठीत फलक होता. त्यामुळे, काही कन्नड संघटनांच्या म्होरक्यांना पोटशूळ उठला. त्यांनी याबाबत महापालिकेकडे तक्रार केली. त्याआधी हॉटेलमध्ये जाऊन दादागिरी करण्याचा प्रयत्न केला होता. हॉटेलचालकाने कन्नड फलक बसविल्यानंतर हॉटेलमध्ये कन्नड बोलण्यात येत नाही, मराठी किंवा हिंदीमध्ये बोला, असे सांगण्यात येते, असा आरोप करत महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव घालण्यात आला. सोशल मीडियावर मराठीविरोधी गरळ ओकण्यात आली.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अखेर कन्नड संघटनांच्या म्होरक्यांसमोर झुकत हॉटेलचालकाने व्यापार परवाना घेतलेला नाही, इमारत बांधकामाला पूर्णत्वाचे प्रमाणपत्र नाही आणि इमारतीत बेकायदेशीर वाणिज्य कृत्य करण्यात येत आहेत, असा ठपका ठेवत गुरुवारी हॉटेलला टाळे ठोकले. महापालिकेच्या या कारवाईबाबत लोकांत संताप व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news