Belgaum mango festival: खवय्यांना पर्वणी, ४० प्रकारचे आंबे उपलब्ध

ह्यूम पार्क येथे आंबा प्रदर्शन, विक्री महोत्‍सवाला प्रारंभ : उद्यापर्यंत सुरू राहणार
Belgaum mango festival: खवय्यांना पर्वणी, ४० प्रकारचे आंबे उपलब्ध
Published on
Updated on

बेळगाव : फलोत्पान विभाग, जिल्हा पंचायत बेळगाव यांच्यावतीने आंबा प्रदर्शन आणि विक्री महोत्‍सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा उद्घाटन कार्यक्रम शुक्रवारी क्लब रोडवरील ह्यूम पार्क येथे करण्यात आला. बेळगाव उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक चेतनसिंग राठोड यांच्याहस्ते आंबा प्रदर्शन आणि विक्री महोत्‍सवाचे उद्घाटन करण्‍यात आले. विक्री व प्रदर्शन रविवार दि. १० पर्यंत सुरू राहणार असून प्रदर्शनात ४० प्रकारच्या आंब्याच्या वाणांचा समावेश आहे.

ते म्हणाले, शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना वाजवी दरात दर्जेदार आंबे विकण्याच्या उद्देशाने या आंबा महोत्‍सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील जनतेने यामध्‍ये सहभागी होऊन महोत्‍सव यशस्वी करावा.

जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील विविध तालुके आणि धारवाड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांनी आपले आंबे विक्रीसाठी ठेवले आहेत. याशिवाय, महाराष्ट्रातील देवगड आणि पंढरपूर येथील शेतकरीही आपले आंबे विकण्यासाठी आले आहेत. अल्फान्सो, केसर, गोवा मानकूर, मल्लिका, बिटकी यासह विविध प्रकारचे आंबे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. लोकांनी थेट आंबे खरेदी करावेत.

विक्रीसोबतच, आंब्याच्या ४० विविध जाती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. यातून नागरिकांना आंब्याच्या विविध जातींविषयी माहिती देण्यात येत आहे. विक्री प्रदर्शन ८ ते १० मे या तीन दिवसांसाठी आयोजित केल्याची माहिती सीईओ शिंदे यांनी दिली. कार्यक्रमाला पंचहमी योजनांचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे, फलोत्पादन विभागाचे जिल्हा सहसंचालक महांतेश मुरगोड यांच्यासह फलोत्पान विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी पस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news