Belgaum gaur hunting Case: शिर्सीजवळ गव्याची शिकार करणाऱ्यास अटक

शिर्सी विभागाच्या हुलेकल वनाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत गव्यांच्या शिकारींचे मोठे जाळे उघडकीस आणण्यात यश मिळवले
Belgaum gaur hunting Case: शिर्सीजवळ गव्याची शिकार करणाऱ्यास अटक
Published on
Updated on

खानापूर : शिर्सी विभागाच्या हुलेकल वनाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत गव्यांच्या शिकारींचे मोठे जाळे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे. वनाधिकाऱ्यांनी गव्याच्या शिकारीच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक केली असून अन्य चार जणांच्या अटकेसाठी सापळा रचला आहे.

येथील अब्दुलसलीम अब्दुलरब्बू साब (वय ४४, रा. सोदेपेट ता. शिर्सी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच गावातील हसन मौलाली बेन्नेसाब, हन्नाना अब्दुल रब्बू साब, सलीम उस्मान साब आणि अब्दुल करीम हे फरार आहेत. अटक केलेल्या संशयितांकडून गव्याच्या मांसाचे अवशेष, तुकडे, प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.

शिर्सी विभागाचे उपवनसंरक्षक संदीप सूर्यवंशी आणि जनमाने उपविभागाचे साहायक वनसंरक्षक हरीश सी.एन. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई हुलेकल विभागाचे वनक्षेत्रपाल शिवानंद निंगाणी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news