Belgaum theft news: मोलकरणीने चोरले सात तोळ्यांचे दागिने

महिलेला अटक; साथीदाराच्या मदतीने चोरी
Belgaum theft news
Belgaum theft newsPudhari
Published on
Updated on

बेळगाव : घरात काम करणाऱ्या मोलकरणीने तब्बल सात तोळ्यांचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. तिने जादा दागिने चोरले होते. परंतु, खर्च करुन राहिलेले सुमारे सात तोळ्यांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. उर्वरित दागिन्यांचा तपास सुरू आहे. मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, ललिता प्रकाश ममदापूर रा. शिवाजीनगर चौथा क्रॉस) या महिलेने 9 मार्च रोजी मार्केट पोलिसांत चोरीची फिर्याद दिली होती. यामध्ये त्यांनी म्हटले होते की आपल्या घरातील दागिने चोरीला गेले आहेत. पोलिसांनी याचा तपास केला असता सुरेखा बसवराज तळवार (वय 40, रा. उप्पार गल्ली, खासबाग बेळगाव) या त्यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीने ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी तिला अटक केली असून मार्केट पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. तिने तिच्या साथीदाराच्या मदतीने ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले असून त्याचा शोध सुरू आहे. या महिलेकडून साडेनऊ लाखाचे सात तोळ्यांचे दागिने जप्त केले आहेत. मार्केटचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक हुसेन केरूर, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news