Belgaum News : मच्छेत पाण्याच्या टाकीत पडून वृध्देचा मृत्यू

मच्छेतील लोहार गल्ली येथील घटना
Belgaum News : मच्छेत पाण्याच्या टाकीत पडून वृध्देचा मृत्यू
Published on: 
Updated on: 

बेळगाव : पाण्याच्या टाकीत पडून वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २९) मच्छेतील येथील लोहार गल्लीत उघडकीस आली. प्रमिला यळ्ळूरकर (वय ७०) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, प्रमिला घटस्फोटानंतर गेल्या २५ वर्षांपासून आपल्या भावाच्या घरी राहत होत्या. त्यांना मागील १० ते १५ वर्षांपासून मूळव्याधीचा त्रास होता. महिनाभरापूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.

मात्र, त्यानंतरही वेदना कमी होत नसल्याने त्या केवळ पाणी आणि चहा घेत होत्या. यामुळे त्या अशक्त झाल्या होत्या. त्यामुळे तोल जाऊन त्या पाण्याच्या टाकीत पडल्या. घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.