बीके कंग्राळी येथील ४१ वर्षांनी भरणाऱ्या 'श्री लक्ष्मीदेवी'च्या यात्रेनिमित्त धार्मिक विधी उत्साहात

Belgaum Kangrali News | यात्रा एप्रिल २०२६ मध्ये भरणार
Kangrali Lakshmidevi Yatra
भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढून गावातील सर्व देव देवतांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजन करण्यात आले.Pudhari Photo
Published on
Updated on

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : कंग्राळी खुर्द - बीके कंग्राळी (ता. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी यात्रा पूर्व धार्मिक विधी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहत पार पडले. ही यात्रा पुढील वर्षी एप्रिल २०२६ मध्ये भरणार असल्याचे देवस्थान पंच कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.

या यात्रापूर्व धार्मिक विधीच्या निमित्ताने काल सकाळी श्री लक्ष्मी देवीचे विधिवत पूजन देवस्थान पंच कमिटी, ग्राम पंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठीत नागरिकांच्या वतीने करण्यात आले . त्यानंतर गावासह परिसरात सुख, शांती व समाधानाचे वातावरण राहो, अशी प्रार्थना करून गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढून गावातील सर्व देव देवतांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजन करण्यात आले.

त्यानंतर ज्या ठिकाणी श्री लक्ष्मी गदगेला बसणार आहे. त्या ठिकाणी चबूतऱ्यांचे पूजन देवस्थान पंच कमिटीचे श्री मारुती पाटील व श्री लक्ष्मी पूजारी रामा सुतार यांनी सपत्नीक पूजन केले. यावेळी रेणुका देवी भक्तांनी भंडाऱ्याची उधळण केली. सर्व विधी अगदी भक्तीभावाने देवदेवतांचा जयघोष करत पार पाडले . शेवटी सामुहिक आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी देवस्थान पंच कमिटी, ग्रामपंचायत, तरुण व महिला मंडळे यांनी परिश्रम घेतले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पवार व शंकर पाटील यांनी केले. गावची यात्रा यापूर्वी डिसेंबर १९८४ मध्ये भरली होती. आता यात्रेपूर्व धार्मिक विधी पार पडल्याने गावात उत्साहाचे वातावरण आहे. ग्रामस्थ तयारीला लागले आहेत.

Kangrali Lakshmidevi Yatra
बेळगाव : मुचंडी येथील सिद्धेश्वर यात्रा थाटात साजरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news