

Hippargi Dam Gate Broken
चिकोडी : कर्नाटकातील कृष्णा नदीवरील हिप्परगी धरणाच्या पहिल्या क्रेस्ट गेट तुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. मंगळवारी (दि.६) या धरणाचा एक गेट तुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. त्यामुळे कृष्णा नदी काठावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील अथणी आणि बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यांच्या सीमेवर कृष्णा नदीवर ६ टीएमसी क्षमतेचे हिप्परगी धरण उभारलेले आहे.
कर्नाटकात कृष्णा नदीवरील पहिले छोटे धरण हिप्परगी व त्यानंतर मोठ्या आकाराचे अलमट्टी धरण उभारण्यात आले असून, या दोन्ही धरणांमध्ये पाणी अडवल्याने पावसाळ्यात महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली जिल्ह्यांमध्ये महापूराची परिस्थिती प्रत्येक वर्षी उद्भवते.