Belgaum Accident : कोगनोळीजवळ अपघातात पत्‍नी ठार, पती जखमी

कोगनोळी-हणबरवाडी रस्त्यावरील पसारे वस्तीनजीक दुचाकी आणि ट्रॅक्टरमध्ये अपघात
Accident
AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

कोगनोळी : कोगनोळी-हणबरवाडी रस्त्यावरील पसारे वस्तीनजीक दुचाकी आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात पत्‍नी ठार तर पती जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. शालन मल्लू खोत (वय ५६) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

शालन खोत आणि मल्लू रामू खोत (वय ६१) हे दोघे दुचाकीवरून कोगनोळी येथून हणबरवाडीकडे जात होते. रस्त्यावरील उतारावर ऊस वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पंक्चर झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभा होता. त्याचवेळी हणबरवाडीकडून दुसरा ट्रॅक्टर येत असताना चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकीला धडक बसली. या अपघातात शालन खोत गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने निपाणी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मल्‍लू खोत यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

बकऱ्याचा कळप चुकवताना दुचाकी थांबवली होती. ट्रॅक्टरवरचा ताबा सुटल्यामुळे महिलेच्या अंगावरूनच ट्रॅक्टर गेल्याचे घटनास्थळी पाहणाऱ्या नागरिकांकडून सांगण्यात आले. या अपघाताची नोंद निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news