

कारवार : गोवा-कारवार-मंगळूरला जोडणारा महत्वाचा मार्ग असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील कारवार येथील काळी नदीवरील जुना पूल शुक्रवारी (दि.14) सकाळी दुसऱ्यांदा कोसळला. एका पिलरचा पाया खचल्याने पुलाचा 40 मीटरचा भाग कोसळला. यापुर्वी 7 ऑगस्टला हा पूल कोसळला होता.
41 वर्ष जुना हा पूल असून पहाटेच्या सुमारास एका पिलरचा पाया खचल्याने ही घटना घडली. यामुळे नवीन पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पावसाळ्यात 7 ऑगस्टला हा पूल कोसळला होता. त्यामुळे पुलाचा कोसळलेला भाग बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. कोसलेला भाग काढण्याचे काम दिवसा सुरु असल्याने दुर्घटना टळली. पहाटे ब्रीजचा जेव्हा 40 मीटरचा भाग कोसळला, तेव्हा तिथे बार्ज होती. मात्र त्याला काही झाले नाही.