Karnataka Border Issue: सीमाप्रश्नी ठरावावरून कन्नडिग तोंडघशी

समिती नगरसेवकांचा मराठी बाणा
Karnataka Border Issue
Karnataka Border Issue
Published on
Updated on

बेळगाव : बेळगाव हे कर्नाटकाचे अविभाज्य अंग आहे, सीमाप्रश्नी महाजन अहवालच अंतिम या ठरावासाठी आकांडतांडव करणाऱ्या काँग्रेसच्या आणि उर्दू नगरसेवकांचा अखेर पुन्हा एकदा अपेक्षाभंग झाला.

प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे या विषयावर चर्चा करण्यास आपला ठाम विरोध असल्याचे सांगून म. ए. समितीच्या दोन नगरसेवकांनी मराठी बाणा जपला, तर महापौरांनीही आम्ही पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो आहोत. जात, भाषा भेद न करता शहराचा विकास करण्यासाठी बद्ध आहोत, असे सांगतानाच सीमाप्रश्नी सरकारच्या निर्णयाशी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगून कन्नडिग नगरसेवकांना गार केले.

महापालिकेत मंग‍ळवारी (दि. १८) तब्बल तीन महिन्यांनंतर महापौर प्रीती कामकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. या सभेत दुपारपर्यंत सीमाप्रश्नाच्या ठरावावर गदारोळ घालण्यात आला.

सभागृहात काँग्रेसचे सरकारनियुक्त नगरसेवक, उर्दू नगरसेवकांनी आणि सभागृहाबाहेर मूठभर कन्नड कार्यकर्त्यांनी थयथयाट केला. सरकारनियुक्त नगरसेवक रमेश सोनटक्की, दिनेश नाशिपुडी यांच्यासह इतर नगरसेवकांनी बेळगाव हे कर्नाटकाचे अविभाज्य अंग आहे, असा ठराव या सभेत झालाच पाहिजे, असा थयथयाट सुरू केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news