Belgaum News: प्रादेशिक आयुक्तांसमोर पुन्हा रडगाणे

तोंडघशी पडूनही कन्नड संघटनांचे ठरावासाठी प्रयत्‍न सुरुच
Belgaum News: प्रादेशिक आयुक्तांसमोर पुन्हा रडगाणे
Published on
Updated on

बेळगाव : महापालिकेत बेळगाव हे कर्नाटकाचे अविभाज्य अंग आहे, असा ठराव करण्यात येत नसल्यामुळे आणि कन्नड संघटनांनी केलेले सर्व आरोप महापौरांनी उडवून लावल्यामुळे कन्नड संघटनांनी गुरुवारी (दि. २७) पुन्हा प्रादेशिक आयुक्तांसमोर रडगाणे गायिले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना महापालिकेत पाठवून वास्तववादी अहवाल देण्याची सूचना करु, अशी ग्वाही प्रादेशिक आयुक्तांनी दिली.

महापालिकेत ठराव होत नसल्यामुळे आणि बैठका होत नसल्यामुळे विकासकामांवर परिणाम झाला आहे. शहरात मुख्यमंत्री आले तरी त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे महापालिका सभागृह बरखास्त करण्यात यावे, अशी कोल्हेकुई कन्नड संघटनांकडून करण्यात येत आहे. दरम्यान महापौर प्रीती कामकर यांनी महापालिकेवर करण्यात आलेले आरोप निराधार असून विकासकामांना निधी देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

प्रादेशिक आयुक्तांकडून दबाव घालून महापौर आणि नगरसेवक बधत नसल्यामुळे आज पुन्हा कन्नड संघटनांच्या म्होरक्यांनी प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांच्याकडे रडगाणे गायीले. त्यामुळे प्रादेशिक आयुक्तांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना महापालिकेला स्वतः जाऊन चौकशी करुन अहवाल द्यावा, अशा सूचना करण्यात येतील, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news