Belgaum jewellery shop theft: सराफी दुकान फोडणारा अटकेत

20 लाखांच्या दागिन्यांसह चोरीतील कार जप्त
Belgaum jewellery shop theft
Belgaum jewellery shop theft: सराफी दुकान फोडणारा अटकेतPudhari
Published on
Updated on

बेळगाव : जानेवारीत वाघवडे क्रॉसजवळील सराफी दुकान फोडणाऱ्या चोरट्याला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली. श्रीनिवास एन ऊर्फ शिनू नरसय्या (वय 37, मूळ रा. तुमकूर सध्या रा. बंगळूर) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 20 लाखाची आठ किलो चांदी व दीड लाखांची कार जप्त केली.

मच्छे गावाजवळील वाघवडे क्रॉस येथील सराफी दुकान 18 जानेवारी 2026 रोजी फोडल्याची फिर्याद महेश गोकुळ काकतीकर (रा. शहापूर) यांनी वडगाव पोलिसांत दिली होती. पोलिसांनी याची नोंद करुन घेत तपास सुरु केला होता.

सीसीटीव्ही फुटेज व अन्य माहितीच्या आधारे वडगाव पोलिसांनी उपरोक्त संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीतील चांदी जप्त केली. बेळगाव ग्रामीणचे पोलिस निरीक्षक नागनगौडा कट्टीमणीगौडर, उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी, संतोष दळवाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news