Belgaum jewellery seized: पाऊण कोटींचे दागिने, रोकड जप्त

दोघांना अटक : केअरटेकरकडून डॉक्टर दांपत्याच्या घरी चोरी
Belgaum jewellery seized: पाऊण कोटींचे दागिने, रोकड जप्त
Published on
Updated on

बेळगाव : वृद्ध डॉक्टरच्या सेवेसाठी केअरटेकर म्हणून घरी असलेल्यांनी तब्बल ९१० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती. यापैकी ५२ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ३५० ग्रॅम सोन्याचे दागिने व २२ लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम असा ७५ लाख ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी शुक्रवारी (दि. २९) पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी दोघांना अटक केली असून राहुल सतीश कांबळे (वय २७) व बाबासाब इराप्पा कटगेरी (वय ३४, दोघेही रा. शेडबाळ, ता. कागवाड) अशी त्यांची नावे आहेत.

ते म्हणाले, उपरोक्त दोघांसह अन्य चौघे संशयित क्लब रोडवरील डॉ. विश्वनाथ धडेद कुटुंबियांच्या घरी केअरटेकरचे काम करत होते. डॉ. धडेद यांचे वय झाल्याने त्यांच्या सेवेसाठी त्यांना ठेवले होते. परंतु, उपरोक्त दोघा संशयितांनी ऑक्टोबर २०२५ ते १० मे २०२६ या आठ महिन्यांच्या कालावधीत या कुटुंबाने कपाटात ठेवलेले दागिने टप्प्याटप्प्याने लांबवले होते. ही बाब डॉ. अनुराधा विश्वनाथ धडेद यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना धक्का बसला. त्यांनी ११ मे रोजी कॅम्प पोलीस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दिली. यामध्ये त्यांनी आपल्या घरातील तब्बल ९१० ग्रॅमचे दागिने चोरीला गेल्याचे नमूद केले.

कॅम्प पोलिसांनी या प्रकरणी सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला होता. याची गांभीर्याने दखल घेऊन कॅम्प पोलिसांकडून तपास सुरु होता. पोलिसांनी उपरोक्त दोघांना अटक करून त्यांच्याकडून दागिने जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.

खडेबाजारचे एसीपी शेखराप्पा एच. यांच्या नेतृत्वाखाली कॅम्पचे निरीक्षक आनंद वणकुद्रे, उपनिरीक्षक ए. रुक्मिणी, आर. आय. सनदी यांनी या प्रकरणाचा छडा लावला. या कारवाईत त्यांचे सहकारी एल. के. पाटील, एस. व्ही. पाटील, बसवराज उज्जीनकोप्प, वाय. एम. मुनवळ्ळी, बी. ए. करेगार, जे. एस. लमाणी, एन. एम. तेली, प्रकाश एस. सन्मनी, तांत्रिक विभागाचे एर. एस. अक्की, एम. एस. काशीद यांनी यामध्ये सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news