Belgaum IPL betting: आयपीएल बेटिंग घेणाऱ्या एकावर गुन्हा

61 हजार रुपयांसह बेटिंग साठी वापरले जाणारे अन्य साहित्य जप्त
Belgaum IPL betting: आयपीएल बेटिंग घेणाऱ्या एकावर गुन्हा
Published on
Updated on

बेळगाव : सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेटवर बेटिंग घेणाऱ्या एकावर एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बाळकृष्ण गोपाळ तोपिनकट्टी (वय 48, रा. मुरलीधर कॉलनी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 61 हजार रुपयांसह बेटिंग साठी वापरले जाणारे अन्य साहित्य जप्त केले. रविवारी रात्री सीसीबी व एपीएमसी पोलिसांनी हा छापा टाकला.

उपरोक्त संशयित मुरलीधर कॉलनी येथे ऑनलाइन बेटिंग घेत असल्याची माहिती सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना मिळाली. त्यांनी एपीएमसीचे पोलीस निरीक्षक उस्मान आवटी व अन्य सहकाऱ्यांना सोबत घेऊन येथे छापा टाकला. यावेळी संबंधित संशयीताकडे पाच सीपीयू, तीन मॉनिटर, एक मोबाईल, हेडफोन, दोन की-पॅड, दोन माऊस तसेच साठ हजार आठशे रुपयांची रोख रक्कम आढळून आली.

संबंधिताला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एपीएमसी चे निरीक्षक उस्मान आवटी पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news