Belgaum Investment Fraud: गुंतवणुकीचे आमिष, सव्वा कोटींची फसवणूक

व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा नफा देण्याचे आमिष दाखवत १ कोटी ३० लाखांची फसवणूक
Investment Fraud
Investment FraudPudhari
Published on: 
Updated on: 

बेळगाव : व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा नफा देण्याचे आमिष दाखवत १ कोटी ३० लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद मार्केट पोलिसात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून घेत तपास सुरु केला आहे.

यासंदर्भात मुसादिक मतवाले यांनी फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, आझमनगरमधील एका महिलेने आपल्या वडिलांच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास महिना पाच टक्के नफा देऊ, असे आमिष दाखवले. त्यानुसार २०२० ते २०२५ या पाच वर्षात १० लाख गुंतवणूक केली. यानंतर वेळोवेळी रक्कम घेत तब्बल १ कोटींवर रक्कम घेतली. त्यातील थोडी रक्कम परत केली असून मूळ मुद्दल व राहिलेली नफ्याची रक्कम दिली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानुसार महिलेसह सहाजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या आठवड्यात या प्रकरणाची नोंद झाल्याचे मार्केट पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची पुढील तपास करीत आहेत. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news