Belgaum News: भरधाव दुचाकी चालविणे आले अंगलट

इंस्टाग्रामवरील व्हिडिओच्या आधारे हुक्केरी पोलिसांची चौघांवर कारवाई
Belgaum News
Belgaum News: भरधाव दुचाकी चालविणे आले अंगलट
Published on
Updated on

बेळगाव : बेल्लद-बागेवाडीत (ता. हुक्केरी) रस्त्यावर भरधाव व बेदरकारपणे दुचाकी चालवून लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या चौघांवर हुक्केरी पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. तसेच त्यांच्यावकडील चार दुचाकीही जप्त केल्या.

इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी चौकशी करुन ही कारवाई केली. अझरुद्दीन इब्राहिम गोकाक, श्रीनाथ चेतन अलगुंडी, प्रवीण बसवराज बिदरे आणि शंकरा महादेव बिद्रोळी (सर्व रा. बेल्लद-बागेवाडी) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, २ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता बागेवाडीतील बसस्थानकाजवळील रस्त्यावर चार मुले यामाहा दुचाकी भरधाव वेगाने व बेदरकारपणे चालवत असल्याचा व्हिडिओ ‘आयान बी‘ या इंस्टाग्राम खात्यावरून प्रसारित करण्यात आला होता.

व्हिडिओची माहिती मिळाल्यानंतर बेल्लद-बागेवाडीचे बीट पोलिस अधिकारी आर. यू. हनुमान यांनी स्थानिक पातळीवर चौकशी करुन संबंधितांची ओळख पटवली. त्यांना शनिवारी (दि. ५) दुचाकींसह ताब्यात घेतले. हेल्मेट न वापरणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे तसेच वाहनाचा विमा नसल्याचे आढळून आल्याने मोटार वाहन कायद्यानुसार त्यांच्यावर एकूण ९,५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

तसेच बीएनएसच्या कलम २८१, २८५ आणि २७० अन्वये गुन्हा दाखल करून चारही यामाहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. हुक्केरीचे पोलिस निरीक्षक एस. आर. गणाचारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news