Belgaum crime: हुक्केरीत आंतरराज्य टोळींचा पर्दाफाश

दुचाकी, ट्रॅक्टर, सोन्याचे दागिने, सोनसाखळी व बकरी चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला
Gang Arrest
Gang ArrestPudhari
Published on
Updated on

बेळगाव : दुचाकी, ट्रॅक्टर, सोन्याचे दागिने, सोनसाखळी व बकरी चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. बेळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील चोरीच्या 15 प्रकरणाचा उलगडा केला असून चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडून 15 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

हुक्केरीतील बागेवाडी क्रॉस जवळ क्रमांक नसलेली दुचाकी चालवताना संशयित उमेश हणमंत गाडीवड्डर उर्फ बागेवाडी (वय 32 रा. बेल्लद बागेवाडी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने गोकाक, संकेश्वर, हुक्केरी, केएलई रुग्णालय, निपाणीसह कागल, मिरज, तासगावमध्ये दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 6 लाख रुपये किमतीच्या 9 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.

सोन्याचे दागिने लांबविणाऱ्या बीड जिल्ह्यातील (महाराष्ट्र) शास्त्रीनगरच्या दीपक एम. जाधव याला ताब्यात घेण्यात आले. त्याने विविध ठिकाणी दोन सोनसाखळ्या चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 4 लाख 50 हजार रुपये किमतीचे 30 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. ट्रॅक्टर चोरल्याप्रकरणी होनग्यातील (ता. बेळगाव) अर्जुन बसवंत शेंडी (वय 44) याला अटक करून त्याच्याकडून 3 लाख 50 हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर जप्त केला आहे.

महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवणाऱ्या निपाणीतील आरती रवींद्र लोंढे (वय 24), पूजा समशेर पठाण (वय 26) यांना अटक करुन त्यांच्याकडून 95 हजार रुपये जप्त केले आहेत. बकरी चोरणाऱ्या मुत्ताप्पा मारुती कामशेट्टी (वय 28रा. कोटबागी ता. हुक्केरी) याला अटक करून त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीची बकरी जप्त केली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news