Belgaum Hubli Bengaluru Train : बेळगाव-हुबळी-बंगळूर विशेष रेल्वे सुरु

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नैर्ऋत्य रेल्वेचा निर्णय
Indian Railways |
Indian Railwaysfile photo
Published on: 
Updated on: 

बेळगाव : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नैर्ऋत्य रेल्वेने बेळगाव-हुबळी-बंगळूर विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेची दि. २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी प्रत्येकी एक फेरी होणार आहे. रेल्वे क्र. ०७३२१ ही विशेष रेल्वे शनिवार, दि. २१ नोव्हेंबररोजी रात्री ८ वाजता बेळगावहून बंगळूर येथील सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनससाठी रवाना होईल.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता ती बंगळूरला पोहोचेल. या प्रवासादरम्यान धारवाड, हुबळी, हावेरी, दावणगेरे, बिरूर, अरसीकेरे, तुमकूर या स्थानकांवर रेल्वे थांबणार आहे. परतीच्या प्रवासासाठी रेल्वे क्र. ०७३२२ ही विशेष रेल्वे रविवारी २२ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजता बंगळूर येथील स्थानकातून हुबळीसाठी रवाना होईल. २३ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता ती हुबळीला पोहोचेल.

या प्रवासात तुमकूर, अरसीकेरे, बिरूर, दावणगेरे आणि हावेरी या स्थानकांवर थांबा असेल. या विशेष रेल्वेला १६ बोगी जोडण्यात येणार आहेत. यामध्ये द्वितीय वातानुकूलित, तृतीय वातानुकूलित, शयनयान, सामान्य द्वितीय श्रेणी, लगेज-कम-ब्रेक व्हॅन, जनरेटर कार तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी अनुकूल डब्याचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.