Belgaum Theft Case: बेळगाव, होनीहाळ येथून 20 तोळे लांबवले

बंद घरे लक्ष्य; शहर, तालुका परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच
Theft
TheftPudhari
Published on
Updated on

बेळगाव : शहर व तालुका परिसरात घरफोड्या वाढत असून कुमारस्वामी ले-आऊट येथील घरातून तब्बल 16 तोळे दागिन्यांची चोरी झाल्याची नोंद एपीएमसी पोलिसांत झाली आहे. याप्रकरणी सर्व्हेयर विठ्ठल मोरे यांनी फिर्याद दिली आहे. तालुक्यातील होनीहाळ येथेही निवृत्त सैनिकाच्या घरातून साडेचार तोळ्यांचे दागिने पळवल्याची नोंद मारिहाळ पोलिसांत झाली आहे.

विठ्ठल मोरे हे मंगळवारी त्यांचे घर बंद करून बाहेरगावी गेले होते. बुधवारी ते परतले तेव्हा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केलाय बेडरूममधील वॉर्डरोबमध्ये ठेवलेले 16 तोळे सोन्याचे दागिने, 220 ग्रॅम चांदीच्या वस्तू पळवून नेल्या आहेत. पोलिसांनी आठ लाख 20 हजार रूपयांच्या चोरीची नोंद करून घेतली आहे.

होनीहाळ येथील निवृत्त सैनिकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी साडेचार तोळ्यांचे दागिने लांबवले. मारिहाळ पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे. मंगळवारी दुपारी ते बुधवारी पहाटेच्या सुमारास ही चोरी झाल्याचा संशय आहे. या दिवशी याच परिसरातील आणखी चार घरे फोडण्याचाही चोरट्यांनी प्रयत्न केला आहे. परंतु, त्यांचे काही चोरीला गेले नसल्याने नोंद झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news