Belgaum News: होमगार्डला बसमध्येच हृदयविकाराचा धक्का

कामावरून घरी परतताना मृत्यू
Belgaum News: होमगार्डला बसमध्येच हृदयविकाराचा धक्का
Published on
Updated on

बेळगाव : कामावरून बसने घरी परतणाऱ्या सांबरा येथील होम गार्डचा बसमध्येय हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. दुर्गाप्पा बसवाणी कोलकार (३९, रा. सांबरा), असे त्याचे नाव असून ते सेंट्रल बस स्टँड येथे सेवा बजावत होते.

दुर्गाप्पा नेहमीप्रमाणे आपली ड्युटी संपवून दुपारी बसने घरी परतत होते. बसमध्येच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. लागलीच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु रुग्णालयाकडे नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय व विवाहित बहीण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news